Satara News : पुसेगावातील कुख्यात गुन्हेगारास केले स्थानबध्द


जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश; एमपीडीए कायद्यानुसार कारवाई
 

Satara News : खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील धोकादायक व कुख्यात गुन्हेगार शीतल उर्फ नितीन खरात (वय २८) याला एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. 

पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी खरात याला एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांना पाठविला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक आनंदसिंह साबळे यांनी पडताळणी करुन हा प्रस्ताव बन्सल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. 

खरात याच्याकडून खून, खुनाचा प्रयत्न, साधी व गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होण्याचे प्रकार घडू शकतात, अशी खात्री झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. 

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश किंद्रे, अशोक थोरात, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार प्रवीण शिंदे, पुसेगावचे सहायक फौजदार आनंदराव जगताप, हवालदार विजय खाडे, सचिन माने, इम्तियाज मुल्ला, सुनील अब्दागिरे, सचिन जगताप, विलास घोरपडे यांनी या कारवाईसाठी विशेष परीश्रम घेतले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या