Satara News : सातारच्या भूविकास बँक चौकात ‘झिंग झिंग झिंगाट’


सराईत गुन्हेगाराचा धिंगाणा; लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाव घेऊन उचलले

Satara News : सातारा येथील भूविकास बँक चौकात दारु पिऊन रात्री गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग करणाNया सराईत गुन्हेगारास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. दत्ता उत्तम घाडगे (रा. दौलतनगर, सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद हवालदार सचिन माने यांनी दिली आहे. 

भूविकास बँक चौकात एकजण दारु पिऊन आरडाओरडा करत होता. बराच काळ त्याचा गोंधळ सुरु होता. काही नागरिकांनी याबाबतची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे बीट मार्शलचे कर्मचारी व पीसीआर व्हॅन तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तरीही त्याचा गोंधळ सुरु होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो शाहूपुरी पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले.

प्रातांधिकाऱ्यांकडे तडीपारीचा प्रस्ताव

त्याच्यावर यापूर्वी चोरी, घरफोडी, गर्दी - मारामारी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वीच त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यामध्ये त्याची जामिनावर सुटका झालेली आहे. त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही प्रातांधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्याला सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दारुबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या