Satara News : जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने, पण काळजी आहेच


नवीन ५९ पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा अठराशेच्या उंबरठ्यावर

Satara News : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. सातारा तालुका वगळता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. 

कोरेगाव, जावली, खंडाळा, वाई तालुक्यांमध्ये २४ तासात प्रत्येकी एकच रूग्ण आढळला आहे. याशिवाय माण (३ रूग्ण), महाबळेश्वर (२ रूग्ण) तालुक्यांमध्येही रूग्णसंख्या नगण्यच आहे. एकूणच आकडेवारी पाहता जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. पण तरीही भय अद्याप संपलेले नाही. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २, मंगळवार पेठ २, शनिवार पेठ १, चिमणपुरा पेठ १,  गोळीबार मैदान २, मोळाचा ओढा १, शाहूपुरी २, देगाव १, कोडोली १, रेवंडे २, शेंद्रे १, अबवडे १.

कराड तालुका : कराड २, शनिवार पेठ १, करवडी २, उंब्रज १, उंडाळे १, काले १, जुळेवाडी ३.

फलटण तालुका : फलटण १, साखरवाडी २, पिंपळवाडी २, पाडेगाव १, तरडफ १.

खटाव तालुका : वडूज १, पुसेगाव ३, कलेढोण १, सिद्धेश्वर कुरोली २, शास्त्रीनगर १, मायणी २.

माण तालुका : म्हसवड २, मार्डी १.

कोरेगाव तालुका : गुजरवाडी १.

जावली तालुका : जावली १,  

खंडाळा तालुका : शिरवळ १,

वाई तालुका : पसरणी १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २८३०६८
  • एकूण बाधित - ५४६५४  
  • घरी सोडण्यात आलेले - ५१६०५  
  • मृत्यू - १७९५
  • उपचारार्थ रुग्ण - १२५४

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या