शेतकऱ्याचा ट्रॅक्टरही पळविला; बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara News : सातारा तालुक्यातील वेणेगाव येथील दोन शेतकऱ्यांकडून सुमारे सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन ऊसतोड मुकादमाने पलायन केले. जाताना त्याने शेतकऱ्याचा ट्रॅक्टरही पळविला. रामेश्वर मगन गोरड (रा. दगडी शहाजानपूर, जि. बीड) असे या मुकादमाचे नाव आहे.
गोरड याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बाळासाहेब घोरपडे (वय ५०, रा. वेणेगाव, ता. सातारा) यांनी याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुनील घोरपडे यांचा ऊसतोडणी वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचा खटाव - माण अँग्रो प्रोसेसिंग प्रा. लि., पडळ या साखर कारखान्याशी करार आहे.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
ऊसतोडणीच्या कामामुळे त्यांची रामेश्वर मगन गोरड या ऊसतोडणी मुकादमाशी सात ते आठ वर्षांपासून ओळख आहे. काही दिवसांपूर्वी रामेश्वर गोरड याने घोरपडे यांच्याकडून बीड येथून ऊसतोडणीसाठी कामगार आणतो असे सांगून दोन लाख ८५ हजार रुपये घेतले. वेणेगावातीलच घोरपडे यांचे मित्र महेश युवराज ताटे यांच्याकडून तीन लाख १३ हजार रुपये घेतले. यावेळी कामगार आणण्यासाठी सुनील घोरपडे यांचा हिंदुस्थान कंपनीचा ट्रॅक्टरही घेऊन तो गेला.
मात्र १५ दिवस उलटूनही तो न आल्याने घोरपडे यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने कामगार घेऊन तीन - चार दिवसांत येतो, असे सांगितले. त्यानंतर मात्र त्याचा मोबाईल क्रमांक स्वीचऑफ येऊ लागला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर घोरपडे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत गोरड याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल पुढील तपास करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या