शासकीय नोकरीच्या संधीसह विविध मागण्यांसाठी छेडले आंदोलन
Satara News : कर्ण, मूकबधीर व्यक्तींना शासकीय नोकरीत संधी द्यावी, दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी मंजूर करावा यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा मूकबधीर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत जगदाळे, अमोल फाळके, उमेश शिंदे, विशाल गुजर, नागेश रिटे, कृष्णात भोसले, केतन मोरे उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात कर्णबधिर व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषा ट्रान्सलेटरची नेमणूक करावी, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवाव्यात, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या मूकबधिर दिव्यांग पुरस्काराची मागील चार वर्षांपासून अंमलबजावणी नाही, ती परंपरा सुरु करावी, प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ८० ते १०० टक्के कर्णबधिरांना वाहन परवाना काढण्यासाठी विशेष सोय करावी, अपंगांना स्वयंरोजगारासाठी कर्जरुपाने अर्थसाहाय्य करावे, शासनाच्या वैद्यकीय समितीकडून मूक, कर्णबधीरांची वैद्यकीय तपासणी करावी, बेरोजगार दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने आठ ते दहा हजार रुपये मानधन मंजूर करावे अशा मागण्या असोसिएशनने पत्रकात केल्या आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या