Satara News : ग्रामपंचायत निवडणूक; सहकारी बँकेत उघडा खाते


बड्या बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाची अनुमती

Satara News : ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या खर्चाचा हिशोब दाखविण्यासाठी बँकांमध्ये नवीन खाते उघडणे बंधनकारक असते. यापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयीकृत बँक व शेड्युल्ड बँकांमध्ये खाते उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र या बँकांमध्ये खाते उघडण्याबाबत सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्याने सहकारी बँकेतही खाते उघडण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा खर्च दाखविण्यासाठी बँकांमध्ये खाते उघडून पासबुकची झेरॉक्स नामनिर्देशन पत्रासोबतच जोडणे बंधनकारक असते. त्यामध्ये निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत दि. ३० डिसेंबरपर्यंत आहे.

अर्ज दाखल करणे होणार सोईचे 

मात्र राष्ट्रीयीकृत बँका व शेड्युल्ड बँकांमध्ये नवीन खाते उघडून त्याचे पासबुक मिळेपर्यंत किमान आठवडा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना मुदतीत अर्ज दाखल करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच सहकारी बँकांमध्ये पूर्वीपासून खाते असल्यास एक ते दोन दिवसांत पासबुक मिळत असून नवीन खाते काढावयाचे असल्यास दोन ते तीन दिवसांत पासबुक मिळते. त्यामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करणे सोईचे होणार आहे.

याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी सहकारी बँकांचाही समावेश करत निवडणूक उमेदवारांना सहकार्य करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या