Satara News : स्वातंत्र्य सैनिक वसंतराव पारवे यांचे निधन



मसूरमधील स्वातंत्र्य चळवळीतील अखेरचा दुवा निखळला

Satara News : कराड तालुक्यातील मसूर येथील स्वातंत्र्य सैनिक वसंतराव नागेश पारवे (वय ८५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मसूरमधील स्वातंत्र्य चळवळीतील अखेरचा दुवा निखळला. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, सहा मुली, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

वसंतराव पारवे तथा अण्णा यांचा गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग होता. त्या काळात पोलिसांशी झालेल्या झटापटीत त्यांना दुखापत झाली होती. त्याच्या खुणा ते लोकांना अभिमानाने दाखवत असत. या लढ्यातील योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठ, पुणे शहर काँग्रेस, मधुकरराव चौधरी स्मृत्यर्थ त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला होता. 

छोडो भारत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२० रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार होणार होता. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव ते त्यासाठी जावू शकले नाहीत.

शासकीय सेवेत उत्तम कार्य

गोवा मुक्तीनंतर अण्णा शासकीय सेवेत गावकामगार तलाठी म्हणून रूजू झाले. पाटण तालुक्यात धामणी, काळगाव, मरळी तसेच ढेबेवाडी आदी ठिकाणी त्यांनी उत्तम काम करून चांगुलपणा मिळवला. त्या भागातील लोक आजही त्यांच्या अडीअडचणी घेऊन अण्णांंकडे येत होते.

त्यांच्या निधनाबद्दल मसूर व परिसरात नागरिकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. शासनाच्या वतीने गावकामगार तलाठी निलेश प्रभुणे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांच्यासह अनेकांनी पारवे यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या