Satara News : ‘हा सागरी किनारा’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन


पालकमंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या उपस्थितीत मसूरमध्ये सोहळा
 

Satara News : सातारा जिल्ह्यातील लोकसाहित्याच्या अभ्यासक व संवेदनशील लेखिका स्वाती चेणगे - बाजारे लिखित 'हा सागरी किनारा' या ललित लेखसंग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. २६) दुपारी ४ वाजता मसूर (ता. कराड) येथील आर. बी. लॉन या ठिकाणी समारंभपूर्वक करण्यात येत आहे.

राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ प्रसारमाध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. 

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, प्रसिध्द ग्रामीण कथाकार बबन पोतदार, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व लेखक विजय उत्तुरे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना 

स्वाती चेणगे - बाजारे यांचा लोकसाहित्यात मोठा व्यासंग आहे. आई जानका चेणगे यांना सर्वजण आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखत. त्यांचा वारसा स्वाती यांनी पुढे चालवला आहे. त्यांचे यापूर्वी ‘ओवी स्त्रीमनाची’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून लोकसाहित्यातील तो मौलिक ठेवा आहे. या साहित्यकृतीनंतर आता ‘हा सागरी किनारा’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व प्रख्यात वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना आहे. 

प्रकाशन कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे असे आवाहन गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, सूर्यकांत बाजारे यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या