ध्वजारोहण, गणहोम आणि राधाकृष्ण विवाह सोहळा साजरा; बुधवारी महाभिषेक
Satara News : सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील देवदेवतांच्या वार्षिक उत्सवास मोठ्या उत्साहात आरंभ झाला आहे. मंदिरात वेदमंत्रांच्या जयघोषात ध्वजारोहण करून या कार्यक्रमांना सुरुवात झाली. मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग व उषा शानभाग यांच्या हस्ते वेदमूर्ती दत्तशास्त्री जोशी व वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले.
ध्वज उभारल्यानंतर प्रधान संकल्प सोडण्यात आला. त्यानंतर विघ्नहत्र्या गणरायाचे आशीर्वाद लाभावे यासाठी गणहोम करण्यात आला. त्यानंतर मंदिरातील श्री राधाकृष्ण देवदेवतांचा कल्याणम अर्थात विवाह सोहळा झाला. यावेळी रमेश शानभाग, उषा शानभाग, विश्वस्त नारायण राव, रमेश हलगेकर, राहुल घायताडे, व्यवस्थापक चंद्रन, प्रमोद लाहोटी आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे वार्षिक रथोत्सव रद्द
सोमवारी (दि. २८) सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव तसेच श्री महागपतीचा रथोत्सव होणार आहे. मंगळवारी सकाळी ५ ते १२ या वेळेत श्री गणपती होम, मूर्ती यात्रा दान आणि रुद्र होम होणार आहे. बुधवारी चतुर्वेद पारायण होऊन पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक होउन या देवाचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सव होणार आहे. त्यानंतर पारायण समाप्ती होऊन महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे.
या सर्व रथोत्सवाच्या कार्यक्रमात सातारकर भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रमेश शानभाग यांनी केले आहे. मात्र, यावर्षी कोरोना आजाराचे संकट असल्याने दरवर्षी साजरा होणारा भव्य दिव्य आणि सातारा शहरातुून निघणारा नटराज आणि देवदेवतांचा वार्षिक रथोत्सव रद्द् करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या