Satara News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार


शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तिघांना अटक

Satara News : सातारा शहरानजीक उपनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

कुणाल सुरेश इंगळे (वय २०, रा. इंद्रायणी मेडिकलजवळ, शाहूनगर, सातारा), अमर अशोक चव्हाण (वय २१, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा), अनिकेत अनिल पिसाळ (वय २१) व संतोष अशोक पवार (दोघेही रा. विकासनगर, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील कुणाल, अमर व अनिकेत यांना अटक करण्यात आली आहे, तर संतोष अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

याबाबत पीडित मुलीच्या नात्यातील महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीचे संशयितांनी अपहरण केले. कुणालने तिला बुधवार दि. ९ रोजी गोडोलीतील धनलक्ष्मी लॉजवर नेले. तेथे दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत तिच्यावर अत्याचार केले. त्याच दिवशी रात्री अमरने अनिकेतच्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला. अनिकेतने दि. १० रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत कास पठारावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला, तर संतोषनेही शुक्रवार दि. ११ ते कालपर्यंत चार दिवस अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीने तिच्या नातेवाईकांना दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या