Satara News : जिल्ह्यात कोरोनाच्या सावटाखाली दत्तजयंती साजरी


सर्वत्र 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' जयघोष आणि दत्तदर्शनाची लगबग

Satara News : सातारा जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरांमध्ये आणि तीर्थक्षेत्री दत्तजयंती जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि भक्तिभावात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होणारा दत्तजन्म सोहळा यावर्षी कोरोनाच्या प्रभावाखाली जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींना अधीन राहूनच पार पडला. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जयघोष आणि दत्तदर्शनाची लगबग अशा भक्तिमय वातावरणाचा प्रत्यय सर्वत्र येत होता. 

सातारा शहरातील आनंदवाडी दत्त मंदिर, प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिर, सज्जनगड येथील समाधी मंदिरापुढील दत्त मंदिर तसेच सातारा शहरातील गेंडामाळ परिसरातील श्री दत्त मंदिरात त्याचबरोबर फलटण, काळज, लोणंद येथील ढाळे कुटुंबीयांचे दत्त मंदिर त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध एसटी आगारातील दत्त मंदिरांमध्ये हा जन्मोत्सव सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी साजरा झाला.

नारायणपूरच्या उत्सवालाही मर्यादा 

सातारा जिल्ह्यानजीकच्या नारायणपूर या तीर्थक्षेत्री एकमुखी दत्ताचे दर्शन घेण्यासाठी नागरिक वर्षभर जात असतात. मात्र यावर्षी दत्तजयंती उत्सवाला मर्यादा आल्या. सातारा शहरातील मुतालिक दत्त मंदिरात तीन दिवस झालेल्या जयंती सोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी मंत्रजागर करण्यात आला. मंगळवारी जयंतीदिनी सकाळी दत्तयाग होऊन सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दत्त जन्म करण्यात आला. बुधवारी सकाळी लघुरुद्राचे पठण होऊन या जन्म सोहळ्याची सांगता होणार आहे.

मुतालिक दत्त मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी यांनी माहिती देताना सांगितले, की दरवर्षीप्रमाणे यावर्षी जन्मकाळाचे कीर्तन कोरोनामुळे रद्द करून केवळ दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले ठेवण्यात आले होते. जन्मकाळानंतर भाविकांना सुंठवडा आणि प्रसाद वितरण करण्यात आला. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये होणारे महाप्रसादाचे कार्यक्रम यावर्षी प्रशासनाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आले होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या