Satara News : हेवेदावे सोडा; ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करा


कोरोना संसर्गाचा धोका टाळण्याच्या दृष्टीने खासदार उदयनराजे यांचे आवाहन

Satara News : कोरोनामुळे गेल्या नऊ, दहा महिन्यांपासून बळीराजासह ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील ९०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावपातळीवरील हेवेदावे सोडून या निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

ग्रामपंचायती हा ग्रामविकासाचा पाया समजला जातो, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या लोकशाहीचा पाया संबोधल्या जातात. गावात आजही निवडणुका सोडून अन्य बाबतीत गट - तट बाजूला ठेवून यात्रा - जत्रा आणि गावाच्या विकासाचे उपक्रम राबविले जातात. निवडणुका आल्या की इर्षेतून घमासान घडते. प्रसंगी गाव वेठीस धरले जाते. अलीकडच्या काळातील निवडणुका पाहिल्या तर जवळजवळ सर्वच गावांत दोन उभे गट पडलेले दिसून येतात.

प्रत्येक कार्यकर्त्याने मर्म जाणावे 

सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी पाहता ग्रामीण भागातील जनता लॉकडाउन, अनलॉक या प्रक्रियेमुळे मेटाकुटीला आली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सुमारे ९०० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुका गावपातळीवरील असल्याने त्याचा धुरळा गावातील प्रत्येक घरात उडणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्याऐवजी हेवेदावेविरहित सर्वांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील. त्यामुळे हेवेदावे विरहित बिनविरोध निवडणुका हे मर्म प्रत्येक कार्यकर्त्याने जाणून घेऊन आपल्या गावच्या हितासाठी साध्य करावे, असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या