शिर्डीप्रमाणे पुसेगाव तीर्थक्षेत्रही नावारूपास यावे यासाठी प्रयत्नशील - देसाई
Satara News : शिर्डीच्या साईबाबा देवस्थानप्रमाणे पुसेगावचे सेवागिरी देवस्थानही नावारूपाला यावे. त्यादृष्टीने या ठिकाणची विकासकामे मार्गी लावताना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पुसेगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथील श्री सेवागिरी महाराजांच्या सुवर्णमंडित समाधीच्या संकल्पपूर्ती समारंभात ते बोलत होते. या सोहळ्यासाठी आमदार महेश शिंदे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, बाळासाहेब जाधव, प्रकाश जाधव यांच्यासह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजहिताची कामे कौतुकास्पद
पुसेगावचे ग्रामदैवत श्री सेवागिरी देवस्थान हे लाखो भक्तांचे श्रध्दास्थान आहे. सेवागिरी देवस्थान ट्रस्टने श्रध्देसोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेली समाजहिताची कामे कौतुकास्पद आहेत, असे उद्गार देसाई यांनी यावेळी काढले. तीर्थक्षेत्रे भाविकांना दिशा देणारी असतात. त्यामुळे तीर्थक्षेत्र पुसेगाव परिसराचा आणखी विकास केला जाईल. शिर्डीच्या साईबाबा देवस्थानप्रमाणे पुसेगाव देवस्थानही नावारूपास यावे म्हणून विविध योजना राबवून विकासकामे केली जातील, असे त्यांनी सांगितले.
देवस्थानच्या विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द केल्या आहेत. प. पू. श्री. सेवागिरी महाराजांचा रथोत्सव दि. १२ जानेवारीला आहे. पुसेगावची वार्षिक यात्रा व विविध कार्यक्रम भरविण्याची परवानगी मिळावी. त्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी चेअरमन मोहनराव जाधव यांनी याप्रसंगी केली.
डॉ. सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. विशाल माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रताप जाधव यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या