Satara News : साताऱ्यात धुमाकूळ घालणारा चोरटा जेरबंद


चोरीला गेलेल्या मोटरसायकली जप्त; सातारा शहर पोलिसांची कामगिरी

Satara News : सातारा शहराच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. संतोष बाळू शिंदे (रा. लोणारवाडी, ता. पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

सातारा शहर हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख विजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व पथकाला मार्गदर्शन करुन चोरट्याला जेरबंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. 

सातारा शहरात हे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत वाहन चोराबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. पथकाने बोगदा परिसरात जावून मिळालेल्या वर्णनाच्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तसेच दुचाकीची कागदपत्रे मागितली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने संबंधित दुचाकी सातारा येथून चोरी केल्याचे सांगितले.

दुचाकी गाड्या चोरल्याची कबुली 

त्याला सातारा शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन दुचाकी सातारा परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने तीनही दुचाकी हस्तगत केल्या असून अन्य एका दुचाकी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पथक त्याच्याकडून घेत आहे. 

या कारवाईत पोलीस हवालदार प्रशांत शेवाळे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, सुनील मोहिते, शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या