Satara News : कोरोनाच्या आकडेवारीने जीव होतोय वरखाली


चोवीस तासात ९ मृत्यू; अलीकडच्या काही दिवसातील उच्चांक

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यू याच्या प्रमाणात चढउतार होत असल्याने जिल्हावासीयांचा जीव वरखाली होत आहे. त्यातही मागील चोवीस तासात ९ बाधितांचा मृत्यू झाला असून हा अलीकडच्या काही दिवसातील उच्चांक असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

शनिवारी रात्री जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बाधितांचा आकडा तब्बल ५२ हजारच्या, तर कोरोनामुक्तांचा आकडा ५० हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २, केसरकर पेठ १, रामाचा गोट १, व्यंकटपुरा १, गोपाळकुंज सोसायटी, संगमनगर १, क्रांती सोसायटी १, धस कॉलनी ३, कामाठीपुरा १, शाहूनगर १, कार्तिक स्वामी मंदिराशेजारी १, भूविकास बँक १, तामजाईनगर १, सदरबझार १, फत्यापुर १, पाडळी १,  हमदाबाज २, शिवथर ११, शिंदी खुर्द १, नेले १, कोंडवे २, कारंडवाडी १, नागठाणे ७, अतित १, सोनगाव १, कोडोली १, पानमळेवाडी १, पाटखळ १, गोवे १, अंगापूर १, जिहे ४, गोजेगाव १, खेड १, क्षेत्रमाहुली १. 

कराड तालुका : कराड १, आगाशिवनगर १, सुपने १, सैदापूर १, कोळेवाडी ३, कुसूर १.

पाटण तालुका : ब्राह्मणपुरी १.

फलटण तालुका : फलटण शहरातील बुधवार पेठ ५, लक्ष्मीनगर १, भडकमकरनगर १, हनुमाननगर १, कसबापेठ २, कोळकी १, पिंपळवाडी - साखरवाडी २, वडजल निंभोरे १, पिंप्रद १, मठाचीवाडी १, निंभोरे २, हिंगणगाव १, जाधववाडी ४, कोळकी २, विडणी ५, रावडी १, मुरुम १, पाडेगाव १, सरकळ १, बरड १, तरडगाव १, मिरेवाडी १.

खटाव तालुका : वडूज ३, पुसेगाव १, साठेवाडी १, रेवळी १, जाखणगाव ३, खटाव ३, पळशी १, मोगराळे १, दातेवाडी १. 

माण तालुका : गोंदवले बुद्रुक २, मासाळवाडी १, धुळदेव १, पांढरवाडी १, ढाकणी १, बनगरवाडी ५, म्हसवड ४, पर्यंती १.

कोरेगाव तालुका : जळगाव १, पिंपरे खुर्द १, आर्वी १, सुर्ली १, कुमठे १, शिरंबे १,  रहिमतपूर २, एकसळ १.

जावली तालुका : रुईघर ४, अमृतवाडी १.

वाई तालुका : गंगापुरी १, सिध्दनाथवाडी १, जांब २, सह्याद्रीनगर १, हवलेवाडी ६.

खंडाळा तालुका : लोणंद ३, कन्हेरी २, मिरजेवाडी १.

महाबळेश्वर तालुका : भिलार २, खिंगर १.

जिल्ह्यात ९ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात बनगरवाडी (ता. माण) येथील ८८ वर्षीय पुरुष, अंबवडे (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, जावली (ता. फलटण) येथील ४५ वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये लोणंद (ता. खंडाळा) येथील ७० वर्षीय महिला व ६९ वर्षीय पुरुष, मारीपेठ (ता. महाबळेश्वर) येथील ७० वर्षीय पुरुष, किन्हई (ता. कोरेगाव) येथील ६० वर्षीय महिला, जळगाव (ता. कोरेगाव)येथील ७० वर्षीय महिला, गावडेवाडी (ता. पाटण) येथील ४४ वर्षीय पुरुष अशा एकूण ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २५६१८२
  • एकूण बाधित - ५१९४७
  • घरी सोडण्यात आलेले - ४९५२३
  • मृत्यू - १७४१
  • उपचारार्थ रुग्ण - ६८३

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या