विमा धनादेशाच्या वितरणप्रसंगी मदनदादा भोसले यांचे प्रतिपादन
Satara News : शेतकऱ्यांच्या काळजीतून नुकसान भरपाई म्हणून विम्याच्या माध्यमातून बुलडाणा अर्बनने १ कोटी १३ लाखांची केलेली मदत शेतकरी हिताची असल्याचे प्रतिपादन किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले.
किसन वीर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस तोडणी यंत्राचे मालक जितेंद्र घाटे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना बुलडाणा अर्बन बँकेच्या वाई शाखेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला होता. त्यांच्या वारसांना २५ लाखांचा धनादेश तर खंडाळा येथील अजित भोसले यांच्या संपूर्ण नुकसान झालेल्या ऊस तोडणी यंत्राच्या नुकसान भरपाईपोटी ८८ लाख रूपयांच्या विमा धनादेशाचे वितरण मदनदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पुणे कमर्शिअल बँकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, उपाध्यक्ष व किसन वीर कारखान्याचे संचालक विजय चव्हाण, मालोजीराजे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लड्डा, पुणे कमर्शिअलचे संचालक अनिल शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
बुलडाणा अर्बनकडून प्रोत्साहन
भोसले पुढे म्हणाले, गेल्या तीन - चार वर्षांपासून सहकारी साखर कारखान्यापुढे ऊसतोड मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत यांत्रिकीकरणाने ऊसतोड करणे हा अभिनव उपक्रम किसन वीरने राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या व्यवस्थापनाने मशिन मालकांना अर्थसहाय्य करून खऱ्या अर्थाने प्रोत्साहित केले आहे.
यांत्रिकीकरणाने ऊसतोडणीस बळ
शिरीष देशपांडे म्हणाले, बुलडाणा सोसायटी व मदनदादा भोसले यांचे एक वेगळे नाते आहे. बुलडाणा सोसायटी व किसन वीरच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी हा शेतकरी न राहता तोही एक उद्योजक, व्यवसायिक व्हावा या उदात्त हेतुने शेतकऱ्यांच्या मालकीचे हार्वेस्टर मशिन खरेदी करून कारखाना व्यवस्थापनाने यांत्रिकीकरणाने ऊसतोडणीस बळ दिले आहे. आज त्याचा फायदा अनेक मशिन मालकांना झाला आहे. सोसायटीने खातेदार, ठेवीदार व कर्जदार यांना विनामोबदला विम्याचे कवच दिलेले आहे, त्याचे महत्व आज लक्षात येत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक बुलडाणा अर्बनचे सातारचे विभागीय व्यवस्थापक मनोहर देशमुख यांनी केले तर विजय चव्हाण यांनी आभार मानले. किसन वीर कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, प्रभारी कार्यकारी संचालक अशोकराव शिंदे, इन्चार्ज अॅग्री मॅनेजर विठ्ठल कदम, बुलडाणा सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी, मयत वारसांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या