केवळ अंडी उधार दिली नाहीत म्हणून खून झाला हे पटत नाही - अलका गोखले
Satara News : सातारा येथील बबन हणमंत गोखले यांच्या खुनाचा सखोल तपास करावा, अशी मागणी गोखले यांच्या पत्नी अलका गोखले व जनता क्रांती दलातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
येथील पॉवरहाऊस परिसरात बबन गोखले यांचा खून ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी तीन, चार चाकू पडले होते. ज्यांना आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे ते दोन्ही आरोपी गोखले यांच्या जवळचे होते. गोखले यांचा कोणाशी वाद नव्हता. मात्र ते या भागातील समाजसेवक व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष होते. अनेकांच्या झोपड्या वसवण्याबरोबरच त्यांना सुविधा देण्याचे काम त्यांनी केले होते. केवळ अंडी उधार दिली नाहीत म्हणून त्यांचा खून झाला आहे असे वाटत नाही, असे अलका गोखले यांनी यावेळी सांगितले.
बबन गोखले यांचा खून करणारे आरोपी शुभम कदम व सचिन माळवे हे स्वत:हून पोलिसात हजर झाले. त्यांचे गोखले यांच्याशी दैनंदिन संबंध होते. काही दिवसांपूर्वी माळवे याने पॉवरहाऊस परिसरात मुलीची छेड काढली होती, म्हणून बबन गोखले यांनी त्याला फटकावले होते. तरी देखील दोन्ही आरोपी हे गोखले यांच्यापाशी असायचे. त्यांनी केवळ अंडी उधार दिली नाहीत म्हणून खून केला हे कारण नाही. त्यात आणखी एक राम साळुंखे नावाचा आरोपी असून त्याला अद्याप अटक केलेली नाही, असे गोखले यांनी सांगितले.
खरा सूत्रधार शोधून काढा
गोखले हे सामाजिक काम करत असल्याने त्यांना छुपे विरोधकही निर्माण झाले असावेत. त्यामुळे समोर आलेल्या कारणापेक्षा वेगळे कारण या खुनामागे असून त्याचा खरा सूत्रधार शोधण्यासाठी आम्ही तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची भेट घेतली.
यातील आरोपी माळवे मूळचा मुंबईचा असून तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याने पॉवरहाऊस परिसरात भांडणेही केली आहेत. त्यामुळे या खुनामागे केवळ हे दोघेच नसून तिसरा आरोपी राम साळुंखे यास अटक करावी तसेच खुनामागील खरा सूत्रधार शोधून आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी अलका गोखले यांनी केली.
शासनाने या कुटुंबाला मदत करावी
कर्ज काढून दुकान सुरू करुन बबन गोखले कुटुंब चालवत होते. त्यांचा खून झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला आहे. या कुटुंबाला मदत करून शासनाने त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी भटक्या - विमुक्त संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रा. हणमंत नलवडे यांनी यावेळी केली. यावेळी जनता क्रांती दलाच्या जिल्हाध्यक्ष पूजा भातकर, वडार संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र नलवडे उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या