दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे उद्गार
Satara News : धनंजय जांभळे यांनी नगरसेवकपदाच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सोडवण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या सोडवून पदाला साजेसे काम केले आहे. त्यांचे कार्य समाजोपयोगी असल्याचे उद्गार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या धनंजयभाऊ या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहर सरचिटणीस जयदीप ठुसे हेही उपस्थित होते.
जांभळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्र. १६ मध्ये विविध प्रकारची विकासकामे मार्गी लागली आहेत. एक होतकरू आणि कष्टाळू युवक म्हणून परिचित असलेल्या जांभळे यांच्या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रकारचे प्रश्न सुटले आहेत आणि पुढेही सुटतील यात शंका नाही. त्यांनी छापलेल्या दिनदर्शिकेमध्ये दैनंदिन माहिती, सणवार यासह अनेक प्रकारची उपयुक्त माहिती आहे. या दिनदर्शिकेचा चांगला उपयोग लोकांना होईल, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या