शासनाच्या परवानगीने मार्चअखेरीस ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय
Satara News : दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारा सातारचा वैभवशाली ग्रंथमहोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला आहे. शासनाच्या परवानगीने मार्चअखेरीस ग्रंथ महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय ग्रंथमहोत्सव समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली.
जिल्ह्यासह देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती संख्येवर मर्यादा असून गर्दी जमवण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे जानेवारीत जिल्हा परिषद मैदानावर होणारा ग्रंथमहोत्सव भरवणे शक्य होणार नाही. त्याबाबत समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली. वातावरण बदलल्यानंतर मार्चअखेरीस शासनाच्या नियमानुसार महोत्सवाचे आयोजन करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रा. वि. ना. लांडगे, प्रल्हाद पारटे, नंदा जाधव, सुनीता कदम उपस्थित होते. दरम्यान, ग्रंथोत्सवाची गौरव गाथा स्मरणिकेच्या स्वरूपात संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रंथ रसिकांनी प्रतिक्रिया व लेख पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या