Satara News : बुलेटने केला घात; एकाचा हकनाक बळी


मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसात गुन्हा दाखल
 

Satara News : वेगाने बुलेट चालवून पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील नेले येथील एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरंग अंतू चव्हाण (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. 

दि. ६ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास ते बुलेटवरुन फडतरवाडीकडे जात होते. यावेळी त्यांच्यामागे राजेंद्र काशीनाथ कणसे (वय ५०, रा. फडतरवाडी, ता. सातारा) बसले होते. चव्हाण यांनी अतिशय वेगाने व निष्काळजीपणे तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन बुलेट चालवली. त्यामुळे फडतरवाडी गावच्या हद्दीत अंगापूर फाटा ते फडतरवाडीस जाणाNया रस्त्यावर माळ नावाच्या शिवाराजवळ राजेंद्र हे खाली पडले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार इसाक मुबारक मुलाणी यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या