Satara News : पाटखळ माथ्याजवळ वाटमारी; दोघे जेरबंद


ट्रक अडवून कुरापत काढली आणि मारहाण करून रोकड हिसकावली
  

Satara News : सातारा तालुक्यातील पाटखळ येथे ट्रक अडवून मारहाण करत चालकाकडील रोकड हिसकावणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहिवडी येथून अटक केली. निखिल प्रकाश वाघमळे (वय २८, रा. अंबवडे, ता. कोरेगाव) आणि रोहित नीलेश आवाड (वय १९, रा. चंचळी, ता. कोरेगाव) अशी त्यांची नावे आहेत.

घोटी (ता. ईगतपुरी) येथील ज्ञानेश्वर रामदास आंबेकर हे ट्रक घेऊन कोल्हापूर येथून नाशिककडे दि. २४ च्या रात्री निघाले होते. चारचाकीतून आलेल्या सहा जणांनी पाटखळ येथे त्यांचा ट्रक अडवला. आमच्या चारचाकीला धडक का मारली, अशी विचारणा करत त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली. त्याचवेळी त्यांनी आंबेकर यांच्याकडील पाच हजारांची रोकड हिसकावून पळ काढला.

सातारा तालुका पोलिसात तक्रार 

याची तक्रार आंबेकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, ज्योतिराम बर्गे, हवालदार आतिश घाडगे, संजय शिर्वेâ, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, सचिन ससाणे, नितीन गोगावले, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, वैभव सावंत हे करीत होते. 

दरोड्यातील संशयित दहिवडी येथे असल्याची माहिती या पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने निखिल वाघमळे आणि रोहित आवाड यांना अटक केली. त्यांचा ताबा सातारा तालुका पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या