Satara News : 'माझा सातारा' पुस्तिकेचे दिमाखात प्रकाशन


जिल्हा माहिती कार्यालयाने पुस्तकरूपाने सिध्द केला जिल्ह्याचा दस्तऐवज

Satara News : सातारा जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या 'माझा सातारा' या पुस्तिकेचे प्रकाशन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात करण्यात आले.

याप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या हृदयात शौर्याच्या पाऊलखुणा

सातारा जिल्हा म्हटले की, निसर्ग सौंदर्याची लयलूट. सह्याद्रीच्या कडेकपारीतील महाबळेश्वर - पाचगणीचे विहंगम सौंदर्य, कासचा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणारा फुलांचा महोत्सव. पण साताऱ्यात याबरोबरच शौर्याच्या अनेक पाऊलखुणा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी रण गाजवलेल्या अनेक घटना आजही या जिल्ह्याच्या हृदयात आहेत. उभ्या महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या अनेक घटनाही याच जिल्ह्यात घडलेल्या आहेत. निसर्ग सौंदर्यासाठी सातारा जिल्हा दक्षिणेचा काश्मीर म्हणून जसा ओळखला जातो, तसेच देशाच्या इतिहासातील वैभवी पान म्हणूनही या जिल्ह्याचे महत्व अपार आहे.

महाराष्ट्राच्या कपाळावरची ललाट रेषा

आजही हा जिल्हा देशातला सैनिकी जिल्हा म्हणून ओळखला जातो. हजारो भूमीपुत्र आजही देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. ही आहे या जिल्ह्याची खासियत. जिल्ह्यातील कोयना धरण पाण्याबरोबर प्रकाशही देत आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या कपाळावरची ललाट रेषाच असावी जणू, एवढे या कोयना धरणाचे महत्व आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणांचा दिशादर्शक म्हणूनही कोयनेकडे पाहिले जाते. पर्यटन, इतिहास याबरोबर धार्मिक अधिष्ठान असलेली अनेक ठिकाणं या जिल्ह्यात आहेत. 

या सर्व श्रीमंतीबरोबर या जिल्ह्याने विकासात्मक कार्यातही राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या समोर अनेक मैलाचे दगड निर्माण केले आहेत. हे सगळे शाश्वत विकासाचे प्रारुप अनेक जिल्ह्यासाठी दिशादर्शक आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांसाठी एकत्र मिळाव्यात म्हणून ‘माझा सातारा’ पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या