Satara News : वासोटा - कास - भांबवली; थर्टी फस्टची एंट्री थांबवली


वन्य जीवांना होऊ शकणारा उपद्रव रोखण्यासाठी तीन दिवस प्रवेशबंदी
  

Satara News : 'थर्टी फस्ट'चे सेलिबे्रशन करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वासोटा किल्ला तसेच कास, भांबवली परिसरात जायचे ठरवत असाल, तर जरा सबुरीनं घ्या. कारण निसर्ग सौंदर्याची खाण असलेली ही साताNयाजवळची पर्यटनस्थळं ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी या तिन्ही दिवशी पर्यटकांसाठी बंद असणार आहेत.  

सातारा शहरापासून जवळ असलेली वासोटा, कास, भांबवली ही ठिकाणं नेहमीच पर्यटकांना साद घालत असतात. विशेषत: थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी हे सर्वांचेच फेवरिट ठिकाण असते. तथापि, निसर्गात जावून उपद्रवी हस्तक्षेप रोखण्यासाठी वासोटा किल्ल्यासह कास पठार, कास तलाव परिसर व भांबवलीचा वजराई धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेश व थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती वन्यजीव विभागाचे बामणोली येथील वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनीस यांनी दिली.

वन्यजीवांना उपद्रव टाळण्यासाठी बंदी

वासोटा किल्ला येथे मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत आहेत. विशेषत: सलग सुट्ट्यांच्या कालावधीत येथे ट्रेकर्सची गर्दी होऊ लागली आहे. जंगल भ्रमंतीचा आनंद घेण्यासाठी वासोट्याला पर्यटकांची रीघ लागलेली असते. नववर्षानिमित्त आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांपासून वन्यजीवांना उपद्रव होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी येत्या ३०, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार आहे.

वनकायद्याचे उल्लंंघन करणारांवर कारवाई

जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले कास पुष्पपठार व भांबवली परिसरातही पर्यटकांच्या हालचालींना या तीन दिवसांसाठी प्रतिबंध राहणार असल्याचे सातारच्या वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांनी सांगितले. या काळात पठारावर तसेच भांबवली, तांबी परिसरात रात्रगस्त राहणार असून वनकायद्याचे उल्लंंघन करणारांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही श्रीमती राठोड यांनी दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या