...तर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुका लढवणार - देसाई
Satara News : शिवसेनेची पक्ष संघटना बांधणी चांगल्या पध्दतीने झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेला जिल्ह्यात चांगले वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर स्वबळावर भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी ठरवले तर महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुका लढवल्या जातील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
शंभूराज देसाई पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
शिवसेनेची सभासद नोंदणीतही आघाडी
ग्रामपंचायत निवडणुका गावपातळीवरील प्रश्नांवर लढविल्या जातात. पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. जिल्ह्यात शिवसेनेने सभासद नोंदणीतही आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळेल. मात्र, महाविकास आघाडीच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी ठरवल्यास त्या माध्यमातूनही निवडणुका लढवल्या जातील, असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी स्थानिक शिवसैनिक खंबीर आहेत. त्यासाठी नेत्यांनी प्रचारात सहभागी होण्याची गरज नाही. पण एखाद्या ग्रामपंचायतीसाठी कार्यकर्त्यांनी मागणी केल्यास पक्षाचे पदाधिकारी प्रचारात सहभागी होतील असेही ते म्हणाले.
वॉर्ड रचनेत ‘घपला’ झाल्याची तक्रार
कोरेगाव तालुक्यातील वॉर्ड रचनेत शासकीय अधिकाऱ्यांना आर्थिक देवाण - घेवाण करुन कमी मतदान असलेले वॉर्ड करण्याचा प्रकार झाला आहे. यासंदर्भात बोलताना महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन कमी लोकसंख्येचे वॉर्ड बनवण्यात आले आहेत. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या