Satara News : काँग्रेसच्या स्थापना दिनी साताऱ्यात कार्यक्रम


जिल्हा काँग्रेसतर्फे ध्वजारोहन, व्याख्यान व स्वातंत्र्य सैनिक सन्मानाचे आयोजन

सातारा : सातारा जिल्हा काँग्रेस समितीतर्फे सोमवार दि. २८ रोजी काँग्रेस पक्षाचा १३६ वा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जावध यांनी सांगितले.

सातारा येथील जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी ९.३० वाजता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता प्रा. श्रीधर साळुंखे यांचे 'स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेस पक्षाचे योगदान' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्य सैनिक व वारसदारांचा सत्कार

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा व त्यांच्या वारसदारांचा जिल्हा काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. 

सर्व ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, ओबीसी विभाग, काँग्रेस सेवादल, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, डॉक्टर सेल इत्यादी विभागांचे सर्व जिल्हा व तालुकाध्यक्ष, तालुका काँग्रेसचे सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास हजर रहावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या