माफीची साक्षीदार ज्योती मांढरेची साक्ष; २ जानेवारीला पुढील सुनावणी
सातारा : संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, नथमल भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला. या घटनेनंतर त्याने आनंद व्यक्त केला. तसेच बहुतेक खून हे पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटी केले अशी साक्ष वाई तालुक्यातील भयानक हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी दिली.
सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र या हत्यांकाडाने हादरला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरु आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्पेâ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत आहेत.
मी पोळच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याने तीन खून केले होते. मी संपर्कात आल्यानंतर मंगला जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांचे खून त्याने केले. यातील बहुतेक खून हे पोळ याने पैशाच्या व सोन्याच्या हव्यासापोटीच केल्याची साक्ष ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिची साक्ष घेतली.
त्यानंतर पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरुवात केली. परंतु न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. २ जानेवारीला होणार आहे.
न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त
खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर खटल्याच्या कामकाजाशिवाय कोणालाच न्यायाधीशांच्या दालनात सोडण्यात आले नाही. या प्रकरणाचा तपास करणाNया पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनाही सुनावणीच्या कक्षात प्रवेश देण्यात आला नाही.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या