लस देणाऱ्या पथकाला परिपूर्ण प्रशिक्षण देण्याच्या डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना
Satara News : कोविड - १९ ची लस उपलब्ध होणार असून ही लस पहिल्यांदा डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना देण्यात यावी. लस देणाऱ्या पूर्ण असे प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे मुख्य सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोविड - १९ लसीबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, कोविड-१९ टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात एकूण ९६ कोल्ड स्टोअरेज
यावेळी कोल्ड स्टोअरेजचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण ९६ कोल्ड स्टोअरेजची साखळी असून १ लिटरमध्ये २१० डोसेस असतात, त्याप्रमाणे विचार केला तर ही संख्या पुरेसी आहे. लस देण्याच्या मोहिमेत जास्तीत जास्त खासगी डॉक्टर व त्यांच्या संघटनांचाही समावेश करुन घ्यावा. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबतही गरज असल्याचे लोकांपर्यंत पोहचवा. तसेच बायोमेडीक वेस्ट विल्हेवाट लावण्याविषयी संबंधितांना प्रशिक्षण द्या, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत शेवटी दिल्या.
२८३०६८ नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून याचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. रॅट टेस्टींगचे प्रमाण ५५.६९ टक्के, आरटीपीसीआर टेस्टींगचे प्रमाण ४४.२३ टक्के आहे. ब्रिटनवरुन ४१ नागरिक आले आहेत त्यांचे टेस्टींग केले असून हे सर्व निगेटिव्ह असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या बैठकीत सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या