Satara News : प्रा. डॉ. एन. डी. व सरोजताई पाटील यांचा सन्मान


शरद- प्रतिभा पुरस्कार जाहीर; मंगळवारी कोल्हापूर येथे वितरण

Satara News : गोरगरिबांच्या कल्याणासाठी, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आणि जातीअंतासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या जोडप्यांना वंदन करण्यासाठी शरद - प्रतिभा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वर्षीच्या पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोजताई पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

या पुरस्काराचे वितरण मंगळवारी (दि. २९) सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर येथे राजर्षि शाहू कॉलेज या ठिकाणी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

सामाजिक, शिक्षण, सांस्कृतिक, शेती, अर्थकारण तसेच आश्रमशाळांच्या माध्यमातून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोजताई पाटील यांनी सातत्याने कार्य केले आहे. म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे, असे ‘मी कास्ट फ्री... मुव्हमेंट’चे अध्यक्ष, लेखक व दिग्दर्शक डॉ. प्रशांत गेडाम यांनी सांगितले.

पवार दांपत्याच्या नावाने पुरस्कार 

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संस्कृती चेहरा टिकवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे फार मोठे योगदान आहे आणि यामध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी प्रतिभाताई खंबीरपणे उभे राहून साथ देत आहेत. म्हणूनच शरद पवार यांच्या जन्मदिनी त्यांच्या व प्रतिभाताई यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि सत्यशोधक पोषाख, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते हे भूषवणार आहेत. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य एम. बी. शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील व राज्य समन्वयक संतोष साखरे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या