Satara News : सातारा जिल्हा परिषदेची सभा होणार ऑफलाइन


एप्रिलपासून सर्वसाधारण सभा, विषय समिती सभा होत होत्या ऑनलाइन 

Satara News : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व विषय समिती सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन सुरु होत्या. मात्र या महिन्यात मंगळवार दि. ८ रोजी होणारी सर्वसाधारण सभा नियम व अटींचे पालन करुन जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ऑफलाइन घेण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

डिसेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी नियम व अटींचे पालन केले जाणार आहे. सभेसाठी सर्व सदस्य, खातेप्रमुखांसह केवळ १५० व्यक्तींना  सभागृहात उपस्थित राहता येणार आहे. सभेच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान दोन खुर्च्यांचे अंतर ठेवले जाणार आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर, मास्क बंधनकारक, सामाजिक अंतर आदी नियम बंधनकारक राहणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदिल 

दरम्यान, जिल्हा परिषदेची यापूर्वीची सर्वसाधारण सभा दि. १७ मार्चला सभागृहात घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दि. १२ जून व दि. ९ सप्टेंबरची सर्वसाधारण सभा, प्रत्येक विषय समितीची सभा ऑनलाइन घेण्यात आली होती.

याबाबत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सभा व विषय समितीच्या सभा ऑनलाइन पध्दतीने घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या आदेशाचे पालन करत आतापर्यंत सर्व सभा व बैठका ऑनलाइन पध्दतीने झालेल्या आहेत. डिसेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सभागृहात घेण्यास अनुमती देण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना दिले होते. 

दोन दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी यांना दिल्याने पुढील सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेण्याची सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या