Satara News : राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्यांसाठी गुड न्यूज


जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मान्यता

Satara News : ग्रामपंचायत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असून राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दि. ३० डिसेंबरअखेर जात पडताळणीसाठी अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार आहेत, असे उपायुक्त तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्या स्वाती इथापे यांनी सांगितले.

अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवली

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना २८ डिसेंबरपासून इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इत्यादी काही तांत्रिक अडचणी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी विचारात घेऊन इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन) स्वीकारण्याचे तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळदेखील ३० डिसेंबरच्या सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या