बेदम मारहाणीमुळे झाला होता मृत्यू; पोलिसांनी अस्थी व रक्षा घेतली ताब्यात
Satara News : पूर्ववैमनस्यातून खून झालेल्या व्यक्तीच्या सावडण्याचा विधी सुरू असताना खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात भुईंज पोलिसांना यश आले आहे. वाई तालुक्यातील काळंगवाडी येथील ही घटना असून अर्जुन जयसिंग काळंगे - पवार (वय २९) असे मृताचे नाव आहे. भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
काळंगवाडी येथील अर्जुन काळंगे - पवार या युवकाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले होते. त्याचा सावडण्याचा विधी होत असताना काही संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे - खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रणजित भोसले व वैद्यकीय अधिकारी विकास ठोंबरे यांच्यासह काळंगवाडी येथे स्मशानभूमीत जावून तेथील अस्थी व रक्षा ताब्यात घेण्यात आली. काळंगे याचे नातेवाईक व काही ग्रामस्थांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले.
दरम्यान, अर्जुन कांळगे यांच्या पत्नीने गावातीलच विलास हुंडेराव काळंगे - पवार व ओंकार विलास काळंगे - पवार यांच्यावर संशय व्यक्त केला. दोघांनी संगनमताने माझ्या पतीचा खून केल्याचा आरोप तिने केल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन तपास सुरु केला.
पत्नीने दिली महत्वपूर्ण माहिती
त्यामध्ये अर्जुन हा वैफल्यग्रस्त होऊन गेले काही महिने फिरत होता. या अवस्थेत त्याने विलास काळंगे याला शेतात रात्री जावून झोपलेला असताना काठीने मारहाण केली होती. त्याच्या रागातून विलास व ओंकार यांनी अर्जुनला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी दवाखान्यात किरकोळ उपचार करुन अर्जुनला घरी आणले. त्यानंतर त्याचा घरातच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार केले. त्याच्या सावडण्याचा विधी रविवारी सकाळी सुरु होता. त्यावेळी पोलीस तेथे गेले. अर्जुनला उपचारासाठी कोठे कोठे नेले होते याची माहिती त्याच्या पत्नीने सांगितल्यावर स्वत: डॉक्टर असलेल्या शीतल जानवे यांनी या गुन्ह्याची उकल केली.
हवालदार दत्तात्रय घाडगे, बापूराव धायगुडे, विलास धायगुडे, प्रसाद गंगावणे, रविराज दुदुस्कर, सुनील वर्णेकर, तुकाराम पोळ तपासात सहकार्य करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या