वनसंरक्षक रमेश कुमार अध्यक्ष, रोहन भाटे, विश्वास काटदरे सदस्य
Wild Life News : गेल्या काही वर्षात खवल्या मांजराची शिकार आणि जिवंत तस्करीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यावर अभ्यासगट नेमून कृती आराखडा करण्यास वनखात्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ञांना समाविष्ट करून तांत्रिक अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. यामुळे राज्यात प्रथमच खवल्या मांजरांचा यादृष्टीने अभ्यास होईल.
खवले माांजर (इंग्रजीमध्ये भारतीय पेंगोलीन; शास्त्रोक्त नाव - मानीस क्रासीकाऊडाटा) ही एक महत्वाची प्रजाती असून वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत अनुसूची - १ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ही प्रजाती महाराष्ट्रातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येते. परंतु विविध कारणांमुळे या प्रजातीच्या अस्तित्वाला धोके निर्माण होत आहेत. तसेच खवल्या मांजराची शिकार ही एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे.
संघटीत गुन्हेगारीच्या घटना उघड
मुख्यत्वे त्यांच्या खवल्यांकरिता त्यांची शिकार केली जाण्याचे प्रकार होऊन यामध्ये संघटीत गुन्हेगारीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. वरील परिस्थितीचा विचार करता दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत मांडले होते.
या कारणास्तव अधिवास व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे, गुप्त माहिती मिळवणे, जनजागृती करणे इत्यादी बाबींचा विचार करून खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. परवाच १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याबाबतीत निर्णय घेतला.
- तयार करण्यात आलेला अभ्यासगट
- अध्यक्ष : रमेश कुमार, वनसंरक्षक (वन्यजीव), पुणे
- सदस्य सचिव : डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक (प्रा), सातारा वनविभाग
- सदस्य :
- रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा
- दीपक खाडे, उपवनसंरक्षक (प्रा), रत्नागिरी वनविभाग, चिपळूण
- विश्वास काटदरे, राज्य वन्यजीव मंडळ सदस्य, चिपळूण
- डॉ. वरद गिरी, पुणे
- नितीन देसाई, संचालक, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया
असे असेल या समितीचे कार्य
खवले मांजर प्रजातीचे पर्यावरणशास्त्र, अस्तित्व व त्यांना असलेल्या धोक्यांचा अभ्यास करणे.
खवले मांजरीच्या अवैध व्यापाराच्या व्याप्तीचा अभ्यास करणे व महाराष्ट्रातील अवैध व्यापारावर
आळा घालण्यासाठी संभावित क्षेत्राची निवड करणे.
खवले मांजरीच्या अधिवास व्यवस्थापनासाठी तसेच संवर्धनाकरिता उपाययोजना सुचविणे.
खवले मांजरीच्या शिकारीवर आळा घालण्यासाठी संरक्षण उपाययोजना सुचविणे.
अंधश्रध्देमुळे खवल्या मांजराची शिकार होते. पारंपारिक चीनी औषधे, तर काही ठिकाणी खाण्यासाठी मांस व खवल्यांचा वापर केला जातो. गेल्या २ वर्षात महाराष्ट्रात वीसहून अधिक खवल्या मांजराच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या काही वर्षात खवल्या मांजराची शिकार आणि जिवंत तस्करीत वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यावर अभ्यासगट नेमून कृती आराखडा करण्यास वनखात्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच खवल्या मांजरांचा यादृष्टीने अभ्यास होईल.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या