विजयस्तंभ परिसरातील जागा ताब्यात यावी म्हणून न्यायालयीन लढाई लढणार - डॉ. राऊत
Bheema Koregaon News : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी (दि.१ जानेवारी) सकाळी ६ वाजता भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना दिली. यानंतर त्यांनी वढु बुद्रुक, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आणि या समितीचे प्रमुख दादासाहेब अभंग हे गेली दोन दशके सतत संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षाला महाविकास आघाडी सरकारची पूर्ण साथ लाभेल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. या परिसराचे सौंदर्यीकरण असो की या विजयस्तंभाच्या इतिहासाला व त्यामागील समाजकारणाला साजेशी दालने, संग्रहालय येथे उभारणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
स्थळाचा ताबा सरकारकडे येणे गरजेचे
महाविकास आघाडी सरकार या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करील. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी आणि राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे आणि दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी भीमा कोरेगाव येथे दिले.
हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना
सिद्धनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाडांच्या निवासस्थानी सकाळी ७ च्या सुमारास भेटीला जात असताना डॉ. राऊत यांना लाईट असूनही पुरेसा प्रकाश जाणवला नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी संभाजी महाराज समाधी आणि गायकवाड समाधी परिसर रात्रीही प्रकाशाने उजळून निघावा म्हणून तात्काळ हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना केल्या.
संभाजी महाराज समाधीला अभिवादनवढु बुद्रुक, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ व सिद्धनाथ महाराज गायकवाड यांच्या समाधी स्थळालाही डॉ. राऊत यांनी अभिवादन केले. तसेच सिध्दनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी गायकवाड कुटुंबियांसोबतच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला व गावच्या विकासावर चर्चा केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या