पंपाला कपॅसिटर लावल्यामुळे हरपळवाडी येथील शेतकरी सुखावले
Mahavitaran News : यंदा पाऊसमान चांगले झाल्यामुळे सगळीकडे रब्बी पिके बहरली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांची तारांबळ उडत असून रब्बीचा हंगाम शेतकर्यांसह महावितरणलाही 'ओव्हरलोड' झाला आहे. एकीकडे 'ओव्हरलोडींग'मुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले असताना पंपाला कपॅसिटर लावल्यामुळे रोहित्र व वीजपंप जळण्यापासून वाचवता आल्याने कराड तालुक्यातील हरपळवाडी येथील 'तानाजी पाटील डीपी' वरील शेतकरी सुखावले आहेत.
उंब्रज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार व पाल शाखा अभियंता हनुमंत पिसाळ यांनी हरपळवाडी येथील 'तानाजी पाटील डीपी'वरील सर्व शेतकर्यांना एकत्र करुन सर्वांनी कपॅसिटरचा वापर केल्यास त्यांचे रोहित्र व कृषीपंप दोन्ही जळण्यापासून वाचवले जाऊ शकते हे समजावून सांगितले. या १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावर ९ शेतकर्यांचे पंप असून त्याचा भार १२० अश्वशक्ती इतका आहे.
तर रब्बी पिकांचे नुकसान झाले असते
सर्व शेतकर्यांनी कपॅसिटर लावण्यापूर्वी या रोहित्रामधून १४० अॅम्पीअर इतका करंट खेचला जात होता. तोच करंट योग्य क्षमतेचे कपॅसिटर वापरल्यामुळे १०५ अॅम्पीअरवर आला. कपॅसिटरचा हा परिणाम पाहता शेतकरीही आनंदी झाले. कारण हेच रोहित्र जळाले असते तर त्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले असते, हे त्यांनाही पटले.
सर्व शेतकर्यांनी कपॅसिटरचा वापर करावा, जेणेकरुन रोहित्रावरील २० ते २५ टक्के येणारा अतिरिक्त कमी होऊन रोहित्र व कृषीपंप वाचतील. तसेच ऐन हंगामात होणारी गैरसोय टळेल, असे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी म्हटले आहे.
कृषीपंपाची क्षमता व कपॅसिटरचे प्रमाण
- ३ अश्वशक्ती - १ केव्हीआर
- ५ अश्वशक्ती - २ केव्हीआर
- ७.५ अश्वशक्ती - ३ केव्हीआर
- १२.५ अश्वशक्ती - ५ केव्हीआर
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या