चर्चासत्र, पारितोषिक वितरण, आजी - माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
Sahyadri Tiger Reserve News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ११ वा वर्धापन दिन कोयनानगर येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी वनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या हस्ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुखपत्र असलेल्या ‘सह्याद्री वार्ता’ या मासिकाचे डिजिटल स्वरूपात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये प्रकल्पाच्या भविष्यातील विकासकामे व व्यवस्थापनाबाबत उपस्थितांनी आपले अनुभव सांगितले व सूचना दिल्या.
याप्रसंगी वन्यजीव सप्ताह २०२० च्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गौरवण्यात आले. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम केलेल्या सेवानिवृत्त वनअधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम केलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव फाळके, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बह्मानंद कोष्टी, सीताराम झुरे, निसर्गप्रेमी नाना खामकर, रोहन भाटे तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, निसर्ग मार्गदर्शक, विद्यार्थी, सह्याद्री प्रकल्पात काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या