समता सैनिक दलाच्या वतीने देण्यात आली आंबेडकर पुतळा परिसरात मानवंदना
Satara News : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी दरवर्षी १ जानेवारी रोजी प्रचंड उत्साहात शौर्यदिन साजरा होत असतो. या शौर्यदिनानिमित्त सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात समता सैनिक दलाच्या वतीने आज मानवंंदना देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिस्तबध्दपणे हा कार्यक्रम साजरा झाला.
शौर्यदिनी भीमा कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रमात समता सैनिक दलाच्या मानवंदनेला विशेष महत्व असते. या ऐतिहासिक युध्दातील शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी सातारा येथे मानवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकिन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मेजर जयसिंगराव सोरटे, लेप्टनंट देवेंद्र सपकाळ, सुभेदार मोहन यादव, सुभेदार विश्वनाथ गायकवाड, कमांडर उत्तम कांबळे, कमांडर संयोजना बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
जागवला शौर्यदिनाचा इतिहास
यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ, वंचितचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत, बसपाचे जिल्हाप्रमुख दादासाहेब गायकवाड, अमर गायकवाड, समाजवादी रिपब्लिकनचे पी. डी. साबळे, रिपब्लिकन गवई गटाचे चंद्रकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अशोकराव गायकवाड, चंद्रकांत खंडाईत, अमर गायकवाड आदिंची भाषणे झाली. अरुण पोळ यांनी प्रास्ताविकात शौर्यदिनाचा इतिहास सांगितला. प्रारंभी त्रिसरण पंचशील घेण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतानंतर शाहीर श्रीरंग रणदिवे, शाहीर वैभव गायकवाड, शाहीर भोसले यांनी क्रांतीगीते सादर केली तर समता सैनिक दलाच्या शौर्यगीताने मानवंदनेचा शेवट झाला. सूत्रसंचालन अरुण जावळे यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या