पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरूध्द तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
Satara News : सातारा तालुक्यातील सैदापूर येथे मारहाणीत जखमी झालेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन अनोळखी व्यक्तींवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप जयसिंग पवार (वय ३९, रा. सैदापूर, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी चेतना पवार यांनी फिर्याद दिली आहे. संदीप हे सैनिक असून, सध्या ते सुट्टीवर आले होते. रविवारी दि. २७ रोजी संदीप यांना मारहाण झाली होती. बेदम मारहाण झाल्याने ते जखमी अवस्थेत पडले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुगणालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
गंभीर दुखापत झाल्याचे उघड
शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांना गंभीर दुखापत असल्याचे समोर आले. त्यानुसार वानवडी (जि. पुणे) पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा तपासासाठी तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुका व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अलर्ट झाले आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या