प्रशासनाकडून तगडे नियोजन; ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज
Satara News : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शर्थीने प्रयत्न केले. 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवून नियंत्रण मिळवले. आता लस येण्याचा टप्पा जवळ आला असून जिल्हा प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन सुरु केले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यात तीन ठिकाणी पूर्वतयारी म्हणून ड्राय रन घेण्यात आला.
कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचा ड्राय रन झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्यासह अधिसेविका व परिचारिका आदी उपस्थित होते.
सातारा, मल्हारपेठ येथेही ड्राय रन
सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचा ड्रायरन झाला. यावेळी आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक रामचंद्र जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर कारंजकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, माता बाल संगोपन अधिकारी प्रमोद शिर्के, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी केम्पी पाटील, अधिसेविका व परिचारिका आदी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचा ड्राय रन झाला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या