Satara News : म्हसवड पोलिसांची धडपड कोणाच्या सांगण्यावरून ?


गृहखात्याकडून चौकशी करण्याची शिवसेनेचे संजय भोसले यांची मागणी

Satara News : माण तालुक्यातील काळचौंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी व पदाधिकारी यांच्यावरती झालेला हल्ला आणि या अनुषंगाने घडलेला घटनाक्रम पाहता म्हसवड पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात अडकली असून, म्हसवड पोलीस स्थानिक राजकारण्यांच्या दबावाखाली  येत कोणत्या पुढार्‍याच्या सांगण्यावरुन दुटप्पी भूमिका  बजावत आहेत याची गृहखात्याकडून चौकशी व्हावी, अशी जाहीर मागणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय भोसले यांनी केली आहे.

दि. १५ जानेवारी रोजी दुपारी तालुकाप्रमुख व पदाधिकार्‍यांवरती हल्ला झाल्यानंतर रात्रीचे १२ वाजेपर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेकळे यांनी गुन्हा नोंद करुन न घेता, उलट अन्यायग्रस्त शिवसेना पदाधिकार्‍यांना क्राॅस कंप्लेंटची भीती घालत दमदाटी करुन पोलीस स्टेशनमधून हुसकावून लावल्याची माहिती फोनवरुन कळताच आपण स्वत: व जिल्हाप्रमुख जाधव दि. १६ जानेवारीला म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये अन्यायग्रस्त पदाधिकार्‍यांसोबत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतरही सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेकळे यांची दादागिरी पाहिली जी एका अधिकार्‍याला शोभनीय नव्हती, अशी प्रतिक्रिया भोसले यांनी व्यक्त केली.

शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन करताच यावेळीदेखील या अधिकार्‍याने गुन्हा नोंद केलाच नाही. नाईलाजास्तव फक्त जबाब नोंदवून घेतला. हा बहाणा व बोळवण असल्याचे लक्षात येताच सरतेशेवटी आम्ही नाईलाजास्तव  कायद्याच्या अनुषंगाने हा प्रकार शिवसेना उपनेते नितीन बानुगडे - पाटील यांना आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कळवला. त्यामुळेच मंत्रीमहोदयांनी अप्पर 

पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.  १७ रोजी उच्चस्तरीय समिती नेमून संपूर्ण घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेश दिले. याप्रमाणे आम्ही या दोन दिवसातील म्हसवड पोलिसांच्या वर्तणुकीचे लेखी जबाब दिल्यानंतरच दि. १७ रोजी शिवसेना पदाधिकार्‍यांचा गुन्हा रात्री ११ नंतर नोंदवून घेतला आहे, असे स्पष्टीकरण भोसले यांनी दिले.या तीन दिवसांमध्ये विरोधक एकदाही पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती अन्याय झाल्याची तक्रार घेऊन क्षणभरही न आल्याची खात्रीशीर माहिती असून विरोधक (आरोपींच्या) बचावासाठीच ढेकळे यांनी क्राॅस तक्रार नोंदवून घेतल्याची चर्चा माण तालुक्यात सुरु असून ही क्राॅस कंप्लेंट ही भा.द.क.३९५ मधील एका आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून दिल्यानेच आणि तो आरोपी राजरोसपणे निघून गेल्यानेच यापाठीमागचा बोलविता धनी व षढयंत्रकारी कोण आहेत, कोणीतरी खासदार आहे की आमदार याचीदेखील जनतेत खुमासदार चर्चा सुरु असल्याचे भोसले यांनी सांगितले.

कायद्याचे रक्षण करणारेच कायदा मोडणार्‍यांचे, आरोपींचे रक्षण करताना या प्रकरणामध्ये दिसून येत असून अशा मस्तवाल अधिकार्‍यांचा शिवसेना कायद्यानेच समाचार घेणार असल्याचे भोसले यांनी सरतेशेवटी स्पष्ट केले आहे.

अशा बेजबाबदार अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या