Satara News : अजिंक्यतारा किल्ल्याचे सुशोभिकरण करणार


राजसदरेवर झालेल्या पहिल्याच विशेष सभेत सातारा नगरपालिकेचा ठराव
 

Satara News : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे सुशोभिकरण करण्याच्या विषयाला सातारा नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. इतिहासात प्रथमच अजिंक्यतारा किल्ल्यावरील राजसदरेवर ही सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव पहिले शाहू यांच्या राज्याभिषेक अजिंक्यतारा किल्ल्यावर १२ जानेवारी १७०८ रोजी झाला होता. त्याप्रीत्यर्थ दरवर्षी किल्ल्यावर राज्याभिषेक दिन थाटात साजरा होत असतो. यंदापासून या दिवशी गडावर नगरपालिकेची विशेष सभा घेण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अलीकडेच जाहीर केले होते. त्यानुसार ही सभा आयोजित करण्यात आली होती.

अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी अजिंक्यतार्‍याच्या सुशोभिकरणाच्या विषयाची माहिती दिली. शेखर मोरे - पाटील यांनी गडाच्या वाटेवरील स्ट्रीट लाईट, ओपन जीम सुरु करण्यात यावी अशी मागणी केली. ऐतिहासिक अशा या सभेला सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी, भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. 

नामांकित आर्किटेक्टकडून डिझाईन करणार

या सभेत सभा सचिव हिमाली कुलकर्णी यांनी विषय वाचन केले. अजिंक्यतारा सुशोभिकरणाच्या कामात महाराष्ट्रातील नामांकित आर्किटेक्ट यांच्याकडून डीपीआर तयार करण्यात येणार आहे. गडावरील तलावांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. गडावरील राजसदर, मंदिरे यांचेही नूतनीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यात समावेश करण्यात येणार आहे. साऊंड इफेक्ट देवून प्रयत्न केले जातील, असे अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी यावेळी सांगितले. 

अजिंक्यतारा किल्ल्याचे संवर्धन व्हावे ही समस्त सातारकरांची इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकाशातून काढलेल्या छायाचित्रांच्या पुस्तकात अजिंक्यतार्‍याचा चांगला फोटो त्यांनी काढलेला आहे. त्यांच्यापुढे चांगले प्रेझेंटेशन केल्यास सुशोभिकरणाच्या कामासाठी ते निश्चित निधी उपलब्ध करून देतील, असे प्रतिपादन निशांत पाटील यांनी केले.

चार वर्षांपासून मी या उत्सवाला येतेय. येथे सभा घेण्याविषयी आम्हाला इच्छा होते. तांत्रिक अडचणी होत्या. आज विशेष सभा किल्ल्यावर होत असून हा महाराष्ट्राचा मोठा गौरव आहे, असे नगराध्यक्ष माधवी कदम म्हणाल्या. नगरपालिकेच्या या वर्षीच्या बजेटमध्ये यासाठी ६० लाखाची तरतूद केली होती. पुढे वाढविण्यात येणार आहे, असेही त्यांनी आश्वासन दिले.  

बाळासाहेब ढेकणे यांनी सादर केला पोवाडा

खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक व खंदे मावळे म्हणून बाळासाहेब ढेकणे यांना ओळखले जाते. त्यांच्या अनेक लखबी सातारकरांना ज्ञात आहेत. त्यातील एक म्हणजे जेव्हा इंदिरा गांधी या सातार्‍यात आल्या होत्या, तेव्हा शाहीर पुंडलिक फरांदे यांनी एक पोवाडा गायला होता. तोच पोवाडा आज राजसदरेवर बाळासाहेब ढेकणे यांनी सादर केला. गडावर गड अजिंक्य गड असा तो पोवाडा आहे. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या