Satara News : पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड


नऊजणांवर गुन्हा दाखल; ३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara News : सातारा येथील पोवई नाक्यावरील दूध डेअरी परिसरात भरलेला जुगार अड्डा सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने उद्ध्वस्त केला. याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून एकूण ३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संतोष दिलीप मतकर (वय ३२, रा. मंगळवार पेठ), अक्षय वाघमारे (वय २४, रा. जगतापवाडी, शाहूनगर, सातारा), अमर चंद्रकांत जाधव (वय ३२, रा. शाहूपुरी), सुमित परशुराम बनसोडे (वय २२, रा. म्हसवे, ता. सातारा), अक्षय नंदू जाधव (वय २३, रा. करंजे पेठ), अक्षय संजय जाधव (वय २५, रा. रविवार पेठ), फिरोज युनुस पठाण (वय ५०, रा. सदरबझार), सुभाष वसंत मोरे (वय ४५, रा. बेबलेवाडी, ता. सातारा), जीवन कृष्ण काळे (वय ४२, रा. करंजे पेठ) यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांना पाहताच पळापळ 

सातारा कॅफे व दूध डेअरी परिसरात जुगार अड्डा भरला असल्याची माहिती सातारा उपविभागीय कार्यालयातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार केले व घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच संशयितांची पळापळ झाली. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे जुगार सुरु असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांची रेड पडल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, रिक्षा असा तब्बल ३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरुद्ध जुगारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भीमराव यादव, इनायतुल्ला मुल्ला, मुस्तफा शेख, संतोष देशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या