‘भेदाभेदमुक्त मानव’ मोहिमेला अनेक तरुण जोडले जातील - आ. मकरंद पाटील
Satara News : विद्यार्थी भारती या संघटनेच्या राज्य अध्यक्ष पूजा जया गणाई यांच्या पाच दिवसीय उपोषणाची सांगता आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सरबत देऊन करण्यात आली. ‘भेदाभेदमुक्त मानव’ या संकल्पनेसाठी वाई तालुक्यातील बोपर्डी येथील तारांगण मैत्रकूल या ठिकाणी हे उपोषण करण्यात आले होते. अनेक तरुण या मोहिमेला जोडले जातील व पुढे ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पाचव्या दिवशी पूजा जया गणाई यांना पाठिंबा देण्यासाठी बोपर्डी गावातले दोन विद्यार्थी ओमकार आणि शंतनू तसेच संजीवनी संघटनेच्या राज्यध्यक्षा वैष्णवी जठार, देवयानी ठाकरे, विद्यार्थी भारतीचे कार्यकर्ते संकेत साळवी, विशाल कुंभार, चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी, कार्याध्यक्ष राहुल भाट, मराठी भारती राज्यसंघटक राकेश सुतार. छात्रशक्ती संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर सचिन सुतार आदिंनी साखळी उपोषणाला बसून आपला पाठिंबा दर्शवला.
मोहिमेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा
या मोहिमेला विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी, मराठी भारती राज्याध्यक्षा विजेता भोनकर तसेच छात्रशक्तीच्या सेक्रेटरी स्मिता साळुंखे यांनीदेखील उपोषणस्थळी उपस्थिती दाखवून पाठिंबा दर्शवला व मोहिमेला सदिच्छा दिल्या. पुणे, सातारा, मुंबई, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या मोहिमेला हजेरी लावली व पाठिंबा दर्शवला.
या मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धकांना प्रमानपत्र वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थी भारती संघटनेकडून किरण भोसले व उद्योजिका अमिता देशमुख यांना कल्याण सुंदरम पुरस्कार, सचिन गाढवे यांना विद्यार्थी भूषण पुरस्कार, अक्षय जाधव यांना उत्कृष्ट प्रसारक हा पुरस्कार, आ. ह. साळुंखे यांना जीवन गौरव पुरस्कार, सुभाष वारे यांना मुक्तस्तंभ हा पुरस्कार जाहीर केला अशी माहिती हृतिक ताम्हणकर यांनी दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या