कवठेत नाबार्डच्या माध्यमातून उभारलेल्या पाणलोट प्रकल्पाचे उद्घाटन
Satara News : शेती व शेतकर जगला, वाचला व वाढलाही पाहिजे या उद्देशाने क्रांतिवीरांच्या भूमीत कृषी संस्कृती बहरण्यासाठी नाबार्ड पुरस्कृत पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल, अशी खात्री नाबार्डचे चेअरमन डॉ. सी. आर. चिंतला यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या माध्यमातून उभारलेल्या वाई तालुक्यातील वहागाव व कवठे पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच डॉ. चिंतला यांच्या हस्ते कवठे ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीनकाका पाटील, दत्तानाना ढमाळ, जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. राजेंद्र सरकाळे, ज्ञानदीप पतसंस्थेचे चेअरमन विश्वनाथ पवार, सरपंच श्रीमंत वीर, उपसरपंच गोरख चव्हाण, नाबार्डचे चीफ जनरल मॅनेजर एल. एल. रावल, जनरल मॅनेजर ए. सी. जीना, एम. जे. श्रीनिवासन, प्रदीप पराठे, श्रीप्रसाद अभ्यंकर, सौ. उमराणी, सचिन कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आपले गावी कृष्णाकाठावर असल्याचा आवर्जून उल्लेख करून कृष्णा नदीमुळे वाई तालुक्याशीही आपले जिव्हाळ्याचे नाते असल्याचे आणि आपल्या मातोश्रींचे नावही कृष्णा असल्याचे सांगून या अपूर्व योगायोगासह या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, शेतकरी यांनी दिलेल्या योगदानाचे डॉ. चिंतला यांनी कौतुक केले. हा प्रकल्प तीन वर्षे चालणार असून कवठे व वहागाव परिसरासाठी जलसंधारण प्रकल्प संजीवनी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पाच्या रूपाने प्रगतीचा मार्ग
नितीनकाका पाटील यांनी त्यांच्या भाषणात जलसंधारण प्रकल्पाच्या रूपाने शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग गवसला असल्याचे सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी निधी कमी पडणार नसल्याची खात्री नाबार्डने दिल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
जिल्हा बँकही सहकार्य करेल
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले की, नाबार्डच्या बरोबरीने जिल्हा बँकही कवठे, वहागावच्या विकासासाठी जलसंधारणास सर्वतोपरी सहकार्य करेल. शेती व शेतकऱ्यांना प्रगतीसाठी पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची बहुमोल मदत होईल. यावेळी दत्तात्रय ढमाळ, विश्वनाथ पवार, सरपंच श्रीमंत वीर आदींचीही भाषणे झाली.
भूषण डेरे यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वरी पोळ हिने आभार मानले. राहुल डेरे यांनी मान्यवरांचे स्वागत करताना दीडशे हेक्टर कृषी क्षेत्रावरील या प्रकल्पाने परिसराचा चेहरामोहरा बदलेल असे सांगितले. तसेच नवनवीन आधुनिक कृषी प्रकल्पाद्वारे कृषीक्रांति घडवावी असे आवाहनही केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप पोळ, संदीप डेरे, शेखर डेरे, सचिन पोळ, संदेश डेरे, पुरूषोत्तम डेरे, विक्रम डेरे, विशाल डेरे, विजय पोळ, कृष्णराव डेरे, मारूती पोळ, मधुकर डेरे, माधवराव डेरे आदींसह कवठे कृषीक्रांति फार्मर प्रोड्युसर कंपनी व ज्ञानदीप फार्मर प्रोड्युसर कंपनी सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या