Satara News : मारहाणप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल


लिंबमधील प्रकरणात माध्यमांनी आवाज उठवल्यावर घ्यावी लागली दखल
 

Satara News : सातारा तालुक्यातील लिंब - गोवे येथे सासरा व सुनेस मारहाण केल्याप्रकरणी गोवे येथील पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजन भोसले, संजय भोसले, अक्षय भोसले, अभिजित भोसले, मंगल भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

प्रतीक्षा केवल भोसले (रा. लिंब - गोवे, ता. सातारा) यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे. त्या व सासरे प्रकाश सर्जेराव भोसले हे गोवे येथील बहाराटी नावाच्या शिवारात शेतीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेताच्या बांधावर पाणी देण्यासाठी ठिबकच्या पाइप लावून ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रकाश यांनी राजन भोसले यांनी ठिंबकची पाइप समाईक रस्ता सोडून बाजूला लाव, असे सांगितले.

मारहाणीच्या घटनेमुळे गर्भपात 

त्याचा राग आल्याने संशयितांनी मारहाण केली आहे. यावेळी मंगल भोसले यांनी प्रतीक्षा यांचे केस धरले. राजन याने त्यांच्या पोटावर लाथ मारली, तर संजय रामचंद्र भोसले, अक्षय संजय भोसले यानेही प्रतीक्षा यांना मारहाण करत हाताने धक्काबुक्कीही केली. या घटनेत प्रतीक्षा यांचा गर्भपात करावा लागल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या