सातारा तहसिल कार्यालयाने केलेल्या पाहणीत आढळली ५६ प्रकरणे
Satara News : कुळ कायद्याच्या जमिनीच्या खरेदी - विक्रीवर बंदी असतानाही अवैधरित्या कुळकायद्याच्या जमिनींचे व्यवहार करुन जमिनी विकल्याचे प्रकार सातारा तालुक्यात घडले आहेत. तहसिलदार कार्यालयाने केलेल्या पाहणीमध्ये अशी ५६ प्रकरणे आढळून आली असून पैकी २ प्रकरणांमध्ये दंड भरुन घेण्यात आला व १० प्रकरणांमध्ये दंड भरण्याबाबत अंतिम स्मरणपत्र देण्यात आले आहे. दंड न भरल्यास संबंधितांच्या जमिनी सरकारजमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. एकूण शिल्लक ४४ प्रकरणात सुनावणी सुरु असल्याची माहिती तहसिलदार आशा होळकर यांनी दिली.
कुळकायद्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र तरीही जमीन खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याचे सातारा तालुक्यात निदर्शनास आले आहे. मात्र असे व्यवहार झाले असतील तर सरकारला बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावयाची असते. त्यानंतर जमिनीबाबत झालेला खरेदी-विक्री व्यवहार नियमित होतो. मात्र अनेक वर्षांपासून कुळकायद्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. अनेकांनी त्याचा सरकारी दंड भरलेला नाही.
अनेकांनी दंड भरलेला नाही
तालुक्यात आतापर्यंत असे ५४ व्यवहार समोर आले असून २ जणांनी ३ लाख ४३ हजार १५० रूपये इतकी दंडाची रक्कम भरलेली आहे. उर्वरित अनेकांनी अजूनही दंड भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जमिनी सरकारजमा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही होळकर यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या