जयंतीदिनी नायगावात अभिवादन; देशभर साजरा होण्यासाठी पाठवणार केंद्राकडे प्रस्ताव
Satara News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'महिला शिक्षण दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण देशात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भुजबळ यांनी अभिवादन केले. त्यानंतर पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची त्यांनी पाहणी केली.
यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी खासदार समीर भुजबळ, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनीही क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले.
ब्रिटिश सरकारकडूनही कार्याचा गौरव
फुले दांपत्याने समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे. यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचा ब्रिटीश सरकारनेही गौरव केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यानिमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दांपत्यांने केलेल्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी याप्रसंगी सांगितले.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहे हे फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व त्यागातून शक्य झाले. अनेक अडचणींवर मात व समस्यांना तोंड देवून त्यांनी आपले काम अखंड सुरु ठेवले. त्यांचा जन्म दिवस आता महिला शिक्षण दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होणार आहे. फुले दापंत्यांचे काम प्रेरणादायी असून महाराष्ट्रातील एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करु. त्यांचे विचार गाठीशी बांधून कार्य करु असे वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या