कोरेगाव व सातारा तालुक्यात प्रादुर्भाव वाढला; रहिमतपूरकरांची चिंता वाढली
Satara News : सातारा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून बाधितांचा आकडा ५६ हजार २८९ पर्यंत पोहोचला आहे. तसेच काल रात्रीपासून जिल्ह्यात दोघांचा कोरोनाने बळी घेतला असून मृतांची संख्या १८१४ वर गेली आहे.
सातारा व कोरेगाव तालुक्यात कोरोनाने गंभीर परिस्थिती आली असून जिल्ह्यातील ९० पैकी ५० बाधित या दोन तालुक्यातीलच आहेत. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर व पिंपरी हे कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याने लोकांची चिंता वाढली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ६, मंगळवार तळे १, बसाप्पा पेठ २, शुक्रवार पेठ १, मंगळवार पेठ २, तामजाईनगर २, कळंबे १, माजगाव १, चिंचणेर वंदन १, लिंब २, मौजे पिलाणी १.
कराड तालुका : सोमवार पेठ १, गुरुवार पेठ १, बानुगडेवाडी १, मलकापूर १, रेठरे बुद्रुक १.
फलटण तालुका : फलटण १, कोळकी १, फरांदवाडी १, साठे फाटा, गोखळी १, निंबळक १, निरगुडी १, तरडगाव २, वडगाव १.
वाई तालुका : वाई १, किकली १.
खटाव तालुका : वडूज १, पुसेगाव १, पुसेसावळी १.
माण तालुका : मोगराळे १, ढाकणी १, दहिवडी ५, गोंदवले बुद्रुक २, शेवरी २, पळशी १.
कोरेगाव तालुका : पिंपोडे बुद्रुक १, साप ३, जळगाव १, सातारारोड १, रहिमतपूर ११, निगडी १, किरोली १, सासुर्वे ३, धामणेर १, पिंपरी ७.
खंडाळा तालुका : शिरवळ १, शिंदेवाडी ३.
जावळी तालुका : कुडाळ १, भिवडी १, बामणोली १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी १.
जिल्ह्यात २ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खाजगी रूग्णालयांमध्ये मोर्वे (ता. खंडाळा) येथील ८० वर्षीय पुरुष, म्हसवे (ता. जावली) येथील ८३ वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३१०८११
- एकूण बाधित - ५६२८९
- घरी सोडण्यात आलेले - ५३६९०
- मृत्यू - १८१४
- उपचारार्थ रुग्ण - ७८५
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या