Satara News : लाचखोरांना पाठीशी घालणे झाले त्रासदायक

तेजस्वी सातपुते यांच्या विरोधातील तक्रारीबाबत १४ रोजी खंडपीठापुढे सुनावणी 

Satara News : सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना पाठीशी घालणे सातारच्या माजी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना महागात पडत आहे. यासंदर्भात त्यांच्याविरोधात येथील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे तसेच सवयभान चळवळीचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या तक्रारीवरील सुनावणी १४ जानेवारी रोजी खंडपीठापुढे होणार आहे.
या प्रकरणाची माहिती अशी, सातारा येथील एका शाळेच्या अनुंषगाने राजेंद्र चोरगे आणि इतरांमध्ये न्यायालयीन वाद सुरु आहेत. या वादादरम्यान शाळेचा ताबा घेण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला होता. या अनुषंगाने काही तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तक्रारीच्या चौकशीदरम्यान बेकायदा डांबून ठेवत, टॉर्चर करत लाखो रुपये लाच रुपात स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि दप्तरी विजय शिर्के यांनी स्वीकारल्याची गंभीर तक्रार राजेंद्र चोरगे यांनी केली होती.

कारवाई न करता फेरचौकशीचा घाट

या तक्रारीच्या अनुषंगाने चोरगे यांनी भक्कम पुरावे सादर केले होते. चौकशीत दोषी आढळल्याने शिर्के याला निलंबित करण्यात आले. परंतु या प्रकरणात घनवट यांचाही सहभाग असून असताना त्यांना अभय देऊन पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप चोरगे यांनी त्यावेळी केला होता. त्यानुसार त्यावेळचे जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत स्वतंत्र चौकशी केली. चौकशी अहवाल प्रलंबित असतानाच देशमुख यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर सातपुते यांनी चौकशी अहवालाच्या आधारे कारवाई न करता फेरचौकशी करण्याचा घाटत घातला.
त्यामुळे पोलीस निरीक्षक घनवट यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप करत राजेंद्र चोरगे यांनी तेजस्वी सातपुते यांच्याविरोधात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत चोरगे यांच्या तक्रार अर्जावरील चौकशी दि. १४ जानेवारी सकाळी ११ वाजता निवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होणार आहे. या चौकशीसाठी हजर राहण्याचे सूचनापत्र राजेंद्र चोरगे यांना प्राधिकरणाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी नितीन गायकवाड यांनी दिले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या