विहेजवळील घटनेने घबराट; आरडाओरडा केल्याने बिबट्याने ठोकली धूम
Leopard News : रात्री जेवण करून शतपावली करण्यास बाहेर पडलेल्या मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याची थरारक घटना शुक्रवारी रात्री उशीरा पाटण तालुक्यातील विहे गावाजवळच्या शेडगेवाडी येथे घडली. या हल्ल्यात एक वीसवर्षीय युवक जखमी झाला आहे. इतरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शेडगेवाडी येथील युवक जेवण करून शतपावलीला बाहेर पडले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या समोरच बिबट्या आला. ते आमनेसामने आल्याने बिबट्या बिथरला व त्याने घाबरून त्यापैकी एकावर हल्ला चढवला. यामध्ये हृषिकेश अरविंद थोरात (वय २०) हा जखमी झाला. त्याच्या पायाला व दंडाला दुखापत झाली आहे.
समोर पाहून उडाली घाबरगुंडी
काही समजण्याच्या आत हा सर्व थरार घडल्याने या मुलांची घाबरगुंडी उडाली. घाबरून त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठांनाही याबाबत माहिती देण्यात आली. जखमी युवकाला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले.
दरम्यान, या घटनेने शेडगेवाडी, विहे परिसरात खळबळ उडाली आहे. आजुबाजुला जंगलक्षेत्र व बागायत क्षेत्र वाढल्याने परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ धास्तावले आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या