Satara News : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रशांत नाळेंचे निधन


राहत्या घरी आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले याचेच सर्वांना मोठे कोडे 

सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत रघुनाथराव नाळे (वय २९) यांनी रविवारी दुधेबावी (ता. फलटण) येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या आकस्मिक मृत्युमुळे फलटणसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाळे यांच्यासारख्या सदैव हसतमुख व उत्साही युवकाने असे टोकाचे पाऊल का उचलले याचेच सर्वांना मोठे कोडे पडले आहे.

प्रशांत नाळे यांच्या मागे आईवडील, मोठी विवाहित बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी आईवडील शेतात गेल्यावर ते एकटेच घरी होते. सायंकाळी जेव्हा कुटुंबीय घराकडे परतले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. हाका मारून किंवा दार वाजवून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला तेव्हा प्रशांत यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. गावात तसेच तालुक्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व सर्वांना जबर धक्का बसला. त्यांना तातडीने फलटणला हलवण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मनात काय आहे कळले नाही

प्रशांत नाळे हे राजे गटाचे खंदे समर्थक म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. ते कोणाला रुतणारे नव्हते. सर्वांशी आपुलकीने बोलणारा, संवाद ठेवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना सर्वजण ओळखत होते. आजही सकाळी गावातील ज्या मित्रांशी त्यांची भेट झाली होती, त्यांनी सांगितले की ते नेहमीप्रमाणेच बोलले. त्यामुळे मनात काय आहे कळले नाही. त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

सोमवारी सकाळी साडेसात वाजता नाळे यांच्या पार्थिवावर दुधेबावी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या